महागाव बुज ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा सीईओ सुहास गाडे यांनी घेतला आढावा

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महागाव बुज येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांनी ग्रामपंचायत महागाव बुज येथे क्षेत्रीय भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा येथे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच व्यायाम शाळेची पाहणी करून युवकांच्या आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी विविध शासकीय योजना, घरकुल बांधकामांची सद्यस्थिती, आरोग्यविषयक समस्या तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. यासोबतच आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी सरपंच सो. वंदना प्रवीण दुर्गे, उपसरपंच श्री. संजय चंद्रजी अलोणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अनिल शिवराम बंडावार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ मंडळी तसेच माध्यम अंतर्गत शासकीय कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय पंचायत समिती अहेरीचे गट विकास अधिकारी श्री. गणेश चव्हाण, विस्तार अधिकारी श्री. मनोहर रामटेके व पंचायत समिती अहेरी अंतर्गत विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या क्षेत्रीय भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन अधिक सक्षम होऊन विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top