ग्रामपंचायत महागाव बु.क. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 महागाव बु.क. | प्रतिनिधी

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत महागाव बु.क. येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच सौ. वंदना प्रवीण दुर्गे यांच्या शुभहस्ते ध्वजारोह करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

या प्रसंगी उपसरपंच श्री. संजय चंद्रजी अलोणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अनिल शिवराम बंडावार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ मंडळी तसेच माध्यम अंतर्गत शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये व नागरिकांची कर्तव्ये यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

या निमित्ताने स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण व सर्वांगीण ग्रामविकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमामुळे गावात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा व देशप्रेमाची भावना अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top